भारतीय प्रवाशांनी भरलेल्या विमानाला फ्रान्सने रोखले

मानवी तस्करीचा संशय

भारतीय प्रवाशांनी भरलेल्या विमानाला फ्रान्सने रोखले

मानवी तस्करीच्या संशयामुळे भारतीय प्रवाशांनी भरलेल्या एका विमानाला फ्रान्समध्ये रोखण्यात आले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. हे विमान दुबईतून निकारगुआ येथे जात होते.

भारतीय दूतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली. ‘फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, दुबईहून निकारगुआ जाणाऱ्या विमानाला ताब्यात घेण्यात आले आहे. विमानात ३०३ प्रवासी होते. ज्यातील बहुतेक भारतीय वंशाचे नागरिक होते. दूतावासमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रवाशांचे हित आणि सुरक्षा महत्त्वाची आहे,’ असे भारतीय दूतावासातर्फे ‘एक्स’वर नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना

खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर

प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!

बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार

विदेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यांची उकल करणारे विशेष तपास पथक या प्रकरणांचा तपास करत आहे. यातून मानवी तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चौकशीसाठी दोघांना अटक करण्यात आली आहे. रोमच्या लीजंड एअरलाइन्सच्या या विमानाने दुबईहून उड्डाण केले होते. गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे हे विमान छोट्या विमानतळावर उतरले होते. या दरम्यान पोलिसांना यातून मानवी तस्करी होत असल्याचा संशय आला. प्रवाशांच्या सुविधेसाठी वैट्री विमानतळावर रिसेप्शन हॉलमध्ये प्रवाशांना झोपण्यासाठी गाद्यांची सोयही करण्यात आली आहे.

Exit mobile version