इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

येमेन मधील हौथीही लक्ष्य

इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार

इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी गटामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून इस्रायलकडून वारंवार हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. नुकताच इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूत शहरात एका अपार्टमेंटवर हल्ला केला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, बेरूतच्या कोला जिल्ह्यातील एका अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर झालेल्या हल्ल्यात चार लोक ठार झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. इराणच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांवर हल्ले करत इस्रायलने अलीकडच्या काही दिवसांत गाझा ते लेबनॉनकडे आपले लक्ष वळवले आहे. हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये शुक्रवारी इराण-समर्थित गटाचा नेता हसन नसराल्लाह मारला गेला.

लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि येमेनमधील हौथी यांच्यावर इस्रायलच्या हल्ल्यांची वारंवारता वाढल्याने मध्य पूर्वमध्ये तणाव वाढला आहे. रविवारी, इस्रायलने येमेनमधील हुथी मिलिशिया आणि हिजबुल्लाह प्रमुखाच्या हत्येनंतर संपूर्ण लेबनॉनमधील डझनभर हिजबुल्ला लक्ष्यांवर हवाई हल्ले सुरू केले. येमेनच्या होदेइदाह बंदरावर इस्रायली हवाई हल्ल्यात किमान चार लोक ठार झाले आणि २९ जखमी झाले, असे हुथी संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले. इस्रायलने म्हटले आहे की, हे हल्ले हुथींच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केले आहेत.

हे ही वाचा : 

अखेर ६ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह स्मशानात दफन, पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

मोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट जरांगे…

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान!

लेबनॉनमध्ये, रविवारी इस्रायलच्या हल्ल्यात १०५ लोक ठार झाले. गेल्या दोन आठवड्यात ६ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे की, ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोलतील. त्यांचा असा विश्वास आहे की या प्रदेशात युद्ध टाळले पाहिजे.

Exit mobile version