ऑस्ट्रेलियातील फिलिप बेटावर चार भारतीयांचा बुडून मृत्यू

मृतांमध्ये महिलांचाही समावेश

ऑस्ट्रेलियातील फिलिप बेटावर चार भारतीयांचा बुडून मृत्यू

ऑस्ट्रेलियामध्ये बुडून चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. व्हिक्टोरिया येथील फिलिप आयलंड बीचवरती बुडून चार भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबतची माहिती सोशल मिडीया ‘एक्स’ वर शेअर केली आहे.

व्हिक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.३० वाजता आपत्कालीन सेवांना एक पुरुष आणि तीन महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांच्या पथकाने या चौघांना पाण्यातून बाहेर काढले. पाण्यातून बाहेर काढताच प्राथमिक उपचार म्हणून त्यांना पोलिसांनी सर्वप्रथम सीपीआर दिला. मात्र, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर, एका महिलेचा मेलबर्नमधील अल्फ्रेड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!

उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!

कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!

इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र

दक्षिण-पश्चिम जंगलातील लेण्यांजवळील फिलिप आयलंड बीचवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांची ओळख पटविण्याचे काम अजून सुरू आहे. मृतांपैकी तीन महिलांचे वय २० वर्षे आहे तर पुरुषाचे वय ४० वर्षे इतके आहे. त्यापैकी एक महिला पंजाबमधील फगवाडा येथील होती. आयोगाने या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, मेलबर्नमधील भारतीय दूतावासाची टीम सर्व प्रकारच्या मदतीसाठी पीडितांच्या मित्रांच्या संपर्कात आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version