अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. शुक्रवार, २३ एप्रिल रोजी अफगाणिस्तानमधील उत्तर कुंदुझ प्रांतातील इमाम साहिब जिल्ह्यातील मौलवी सिकंदर मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात तीसहून अधिक लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांत बॉम्बस्फोटाच्या दोन घटना अफगाणिस्तानमध्ये घडल्या आहेत. यापूर्वी गुरुवार, २१ एप्रिल रोजी अफगाणिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. पहिला स्फोट उत्तर मजार-ए-शरीफ येथील साई डोकान मशिदीत झाला, ज्यात ३० जण ठार आणि ४० जण जखमी झाले आहेत. यानंतर, दुसरा स्फोट काबूलच्या दश्त-ए-बरची भागात रस्त्याच्या कडेला झाला, ज्यामध्ये दोन निष्पाप मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांनतर तिसरा स्फोट कुंदुझ प्रांतात एका वाहनावर झाला.
शुक्रवारी दुपारी मौलवी सिकंदर मशिदीत नमाजाच्यावेळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीसहून अधिक लोक ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल कण्यात आले आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूचे लोक घाबरून गेले. हा हल्ला रॉकेटच्या माध्यमातून झाल्याचा दावा समाज माध्यमांनी केला आहे.
हे ही वाचा:
झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
‘हनुमान चालीसा वाचायची असेल आपल्या घरात वाचा’
केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्येही घाबरलो नाही, तर महाराष्ट्रात घाबरायचा प्रश्नच नाही.
यापूर्वी चार दिवसांपूर्वी काबूलमध्ये तीन साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हापासून, तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आले आहे, तेव्हापासून तिथे स्फोटाच्या घटना वाढल्या आहेत.