रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग १४ व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या कंपन्यांनी तेथील सेवा बंद करून त्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
यामध्ये आता पेप्सी, कोक, मॅकडोनाल्ड आणि स्टारबक्स यांनीही कठोर पावले उचलत तेथून त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅकडोनाल्डचे अध्यक्ष आणि सीईओ ख्रिस केम्पझिंस्की यांनी त्यांच्या कर्मचार्यांना एक खुले पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी, ” आमच्या मूल्यांचा अर्थ असा आहे की आम्ही युक्रेनला तोंड देत असलेल्या अनावश्यक मानवी त्रासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे रशियामधील ८५० स्टोअर्स तात्पुरते बंद करणार आहोत. परंतु रशियामधील आपल्या ६२ हजार कर्मचार्यांचे वेतन सुरूच राहणार आहे. तसेच पुन्हा कधी स्टोअर्स चालू होतील हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले आहेत.
कॉफी चेन स्टारबक्सने मंगळवारी सांगितले की, ते रशियामधील सेवा थांबवत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे स्टारबक्सनेही हा निर्णय घेतला आहे. स्टारबक्सचे रशियामध्ये १३० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. स्टारबक्सने म्हटले आहे की, आम्ही सर्व स्टारबक्स उत्पादनांच्या शिपमेंटसह रशियामधील सर्व व्यावसाय निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांनी आळवला जुनाच राग
मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर
महिला दिनाच्या दिवशीच महिला बचत गटाचे हॉटेल पेटवले!
भारताच्या ‘या’ कामगिरीसाठी पाक विद्यार्थीनीने मानले आभार
कोका-कोलाने नेही रशियासाठी एक निवेदन जारी केले आहे. मानवतेच्या संरक्षणात योगदान देण्यासाठी, आम्ही रशियामधील आमचा व्यवसाय तात्पुरते थांबवत आहोत. असे कोका कोलाने सांगितले आहे. त्याशिवाय पेप्सिको आणि जनरल इलेक्ट्रिक या दोघांनीही त्यांचे रशियातील व्यवसाय तात्पुरता बंद करण्याची घोषणा केली आहे. तर रशिया युक्रेनच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीचा स्पोर्ट्सवेअर ब्रँड आणि जगप्रसिद्ध एडीडास ने एक मोठी घोषणा केली आहे. युक्रेनच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून एडीडासने रशियन फुटबॉल महासंघासोबतची भागीदारी निलंबित केली आहे.