28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियाअमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री, नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे निधन

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री, नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे निधन

वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हेन्री किसिंजर यांच्या ‘किसिंजर असोसिएट्स इंक’ या संस्थेकडून त्यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. मात्र, निधनाच्या कारणाविषयी निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. कनेक्टिकटमधील राहत्या घरी किसिंजर यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेन्री किसिंजर यांनी ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात अमेरिकन सरकारचे गृहमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या काळात उत्तर व्हिएतनामशी झालेला पॅरिस शांतता करार, इस्रायल व इतर अरब राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, त्या काळी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या अमेरिका-रशिया शस्त्र निर्बंध चर्चा, चीनशी धोरणात्मक संबंधांची सुरुवात अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हेन्री किसिंजर यांनी समर्थपणे पार पाडल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणात निभावलेली भूमिका अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची ठरली.

हे ही वाचा:

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा भाऊ आणि वडील अटकेत

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची पुन्हा धुरा

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

हेन्री किसिंजर यांना व्हिएतनाम युद्धादरम्यान निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. १९७३ साली झालेल्या व्हिएतनाम युद्धबंदीसाठी त्यांनी उत्तर व्हिएतनामशी यशस्वीरीत्या चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना व उत्तर व्हिएतनामचे ली ड्यूक थो यांना संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एकीकडे किसिंजर यांनी मोठ्या सन्मानाने या पुरस्काराचा स्वीकार केला असताना दुसरीकडे ली ड्यूक थो यांनी मात्र हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. किसिंजर यांच्या निवडीमुळे झालेल्या वादातूनच तत्कालीन नोबेल पुरस्कार निवड समितीतील दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा