अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी त्यांच्या जॉर्जिया येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. १९७७ ते १९८१ या कालावधीत त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली होती. कार्टर यांना त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांना इस्रायल आणि इजिप्तमधील शांततेचे श्रेय दिले जाते.
जिमी कार्टर यांनी १९७६ च्या अमेरिकेतील निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन गेराल्ड फोर्ड यांना पराभूत केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला. १९८० च्या निवडणुकीत अभिनेता- राजकारणी बनलेल्या रोनाल्ड रेगन यांनी त्यांचा पराभव केला होता, त्यांनी यापूर्वी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून काम केले होते.
Former US President Jimmy Carter passed away announced the Carter Center and US media outlets.
— ANI (@ANI) December 29, 2024
“माझे वडील केवळ माझ्यासाठीच नाही तर शांतता, मानवी हक्क आणि निस्वार्थ प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी नायक होते,” असे कार्टर यांचे पुत्र चिप कार्टर यांनी सांगितले. त्यांनी ज्या प्रकारे लोकांना एकत्र आणले त्यामुळे जग हे आमचे कुटुंब आहे आणि त्यांच्या स्मृतीचा सन्मान केल्याबद्दल तुमचे आभारी आहोत, असेही त्यांचे पुत्र म्हणाले.
कार्टर, हे अलिकडच्या काळात यकृत आणि मेंदूसंबंधी आजाराने ग्रस्त होते. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी व्हीलचेअरवर बसून त्यांच्या पत्नी, रोझलिन कार्टर यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली, होती. तेव्हाच ते अत्यंत कमजोर दिसत होते. कार्टर यांना २००२ मध्ये लोकशाही आणि मानवी हक्कांना बळकट करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संघर्षांवर शांततापूर्ण उपाय शोधण्यात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा :
बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!
मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा
संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!
जम्मू काश्मीरात मारले गेलेले ६० टक्के दहशतवादी ‘पाकडे’
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी अधिकृत निवेदन जारी केले आणि जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. असामान्य नेता, राजकारणी आणि मानवतावादी असे म्हणून त्यांना आदरांजली वाहिली.
निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कार्टर हे असे नेते होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात आलेल्या संकटांना तोंड देत सर्व अमेरिकन लोकांचे जीवन सुधारण्यासाठी काम केले. “जिम्मी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्या आव्हानांना तोंड दिले ते आमच्या देशासाठी महत्त्वपूर्ण वेळी आले आणि त्यांनी सर्व अमेरिकन लोकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांच्या सामर्थ्याने सर्व काही केले. त्यासाठी आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत,” असे ट्रम्प म्हणाले.