पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक- ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. भ्रष्टाचार आरोपाप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालायाबाहेरून पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना अटक केल्याचे वृत्त डॉन न्यूजने दिल आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायलयात इम्रान खान यांनी हजेरी लावली होती. तेव्हा न्यालायाबाहेरुनच इम्रान खान यांना रेंजर्सकडून अटक करण्यात आली. त्यांच्या पीटीआय पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याची माहिती आहे.

पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक नाराज झाले आहेत. तसेच पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेनंतर विरोध प्रदर्शनाची घोषणा केली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर सध्या परिस्थिती सामान्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच जमावबंदी लागू करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणार आहे.

हे ही वाचा:

“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”

५० फुटांवरून बस कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू

जाळपोळ होत होती, भयंकर परिस्थिती होती, पण राज्य सरकारने मदतीचा हात दिला

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

यापूर्वी इम्रान खान यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. “माझ्यावर कोणताही खटला नाही. त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे, मी त्यासाठी तयार आहे,” असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांनी अटक करण्यापूर्वी केला होता.

काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयानं एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Exit mobile version