नवाझ शरीफ यांच्या विमानात चोरी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चार वर्षांनंतर मायदेशी

नवाझ शरीफ यांच्या विमानात चोरी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चार वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. ज्या विमानातून ते आले, त्या विमानातही त्यांना इमरान खान यांचे समर्थक भेटले. ते जोरजोरात ‘खानसाहाब जिंदाबाद’च्या घोषणा देऊ लागले. त्याचदरम्यान विमानातील एका प्रवाशाचे सामान चोरीला गेले. त्याचा संपूर्ण विमानात शोध घेतला जात होता. या दरम्यान प्रवाशांमध्येच हमरीतुमरी झाली. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विमानात शरीफ यांच्या पक्षाचा एक नेता आजारी पडला होता. त्यामुळे हे विमान एक तास उशिरा इस्लामाबादेत पोहोचले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ या पक्षाचे नेते मलिक नूर अवान यांचे सामान सापडत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये यावरून भांडण झाले. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

७३ वर्षीय नवाझ शरीफ उम्मीद-ए-पाकिस्तान चार्टर विमानातून दुबईतून इस्लामाबादेत आले. ते गेल्या चार वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहात होते. विमानातून उतरल्यानंतर ते कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि बायोमेट्रिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पक्षनेते इशाक डार यांच्यासोबत विमानतळावरील व्हीआयपी लाँज येथे गेले. त्यानंतर ते मोठ्या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी लाहोरला जाणाऱ्या विमानात बसले.

हे ही वाचा:

पोलिसांच्या गाडीने चार जणांना उडवलं

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता हे विमान निघणार होते. मात्र पक्षनेते मिल नूर अवान हे आजारी पडल्यामुळे हे विमान इस्लामाबादमध्येच थांबवण्यात आले. त्यानंतर क्रू मेंबर्सने अवान यांना विमानातून उतरवले. पीएपएल-एन पक्षाचे अन्य एक नेते नासिर जंजुआ हेदेखील विमानातून बाहेर पडले. त्यानंतर संध्याकाळी चार वाजून २० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले.

Exit mobile version