ब्रिटिश क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा भीषण कार अपघात झाला आहे. तो लोकप्रिय बीबीसी टेलिव्हिजन शो “टॉप गियर” साठी शूटिंग करत असताना त्याला कार अपघात झाला. यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात नेण्यात आले. फ्लिंटॉफ यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी घटनास्थळी उपचार करण्यात आले. फ्लिंटॉफला दुखापत झाली आहे, पण तो धोक्याबाहेर आहे. मंगळवारी दक्षिण लंडनमधील डनफोल्ड पार्क एरोड्रोम येथे इव्हेंटच्या चाचणी ट्रॅकवर फ्लिंटॉफला अपघात झाला.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, फ्लिंटॉफने टॉप गियर मोटार शो सादर करण्यास करण्यास सुरुवात केली. तो येथेही खूप लोकप्रिय आहे. त्याच्या अपघातानंतर मंगळवारी सकाळी टॉप गियर चाचणी ट्रॅकवर झालेल्या अपघातात फ्रेडी जखमी झाला, जिथे क्रू डॉक्टर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा:
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले
फ्लिंटॉफ हा इंग्लंडच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याला ‘फ्रेडी’ म्हणून ओळखले जाते. फ्लिंटॉफने वयाच्या ३२ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इंग्लंडकडून ७९ कसोटी सामने खेळले. त्याच्याकडे बॅट आणि बॉल अशा दोन्ही बाजूंनी सामने फिरवण्याची क्षमता होती. त्याने स्वबळावर इंग्लंडला अनेक सामन्यांमध्ये चॅम्पियन बनवले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत, फ्लिंटॉफने २००५ आणि २००९ मध्ये इंग्लंडला ऍशेस जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. फ्लिंटॉफने ७९ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी ३,८४५ धावा केल्या आणि २२६ विकेट्सही घेतल्या. त्याने पाच शतके झळकावली आणि तीन पाच बळी घेतले. त्याच वेळी, १४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये फ्लिंटॉफने ३,३९४ धावा काढल्या . यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने १६९ विकेट्सही घेतल्या.