कोरोनाची तिसरी लाट आता तोंडावर आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलीच गती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकाच दिवसात देशात दोन कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. हा लसीकरणाचा एक जागतिक विक्रम झालेला आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असून आतापर्यंत चार वेळा एक कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आली आहे.
भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत मोदींच्या वाढदिवशी एक नवा इतिहास रचला. याची दखल देशभरात सर्व माध्यमांतून घेण्यात आली. देशामध्ये (१७ सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला. दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.
देशातील या ऐतिहासिक घटनेचे परदेशी माध्यमांनीही तोंडभरून कौतुक केले आहे. भारतीय लसीकरणाचा डंका त्यामुळे जगभर वाजू लागलेला आहे. भारताची लोकसंख्या पाहता, लसीकरण राबविणे हे फार सहजशक्य नव्हते. परंतु मोदींच्या योग्य नियोजनामुळे मात्र भारताने लसीकरणात चांगलीच घौडदौड केलेली आहे. सध्याच्या घडीला लसीकरणाच्या बाबतीत सर्व जगाचे लक्ष्य त्यामुळे भारताकडे वेधले गेले आहे.
हे ही वाचा:
बीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा
रस्ते दुरुस्ती मुद्द्यावर आता फडणवीसांनी विचारले सवाल
‘सोमैय्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई बेकायदेशीर’
पत्नीचा छळ करणाऱ्या पतीने केले हे भयंकर कृत्य!
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वाढदिवशी एक अमूल्य भेट भारताला दिलेली आहे. अमेरिकेतील न्यूयार्क टाइम्सनेही या लसीकरणाची दखल घेतली असून, त्यांनी या मोहीमेला लसीकरण मोहीम रुळावर आल्याचे म्हटले आहे. तसेच भारताचा एकूण सारासार अभ्यास करून सध्याच्या लसीकरणाचे अमेरिकेतील माध्यमांनी भरभरून कौतुक केले आहे. बीबीसी आणि इंडिपेंडंट या माध्यमांनीही भारतातील या ऐतिहासिक लसीकरणाची दखल घेतली. तसेच लसीकरण हे भाजपाच्या तीन आठवड्यांच्या कार्यक्रमाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे.