स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे ‘अमृत’गान

स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे ‘अमृत’गान

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनोखे आवाहन केले आहे. देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रगीत गाऊन ते संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.

मोदी सरकारने देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे अनोख्या तऱ्हेने साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांनी राष्ट्रगीत गाऊन ते अपलोड करायचे आहे.

आजादी का अमृत महोत्सव देश साजरा करत असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गायलेले राष्ट्रगीत https://rashtragaan.in/ या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. त्यानंतर या सर्व गीतांचे एकत्रिकरण केलेली चित्रफीत १५ ऑगस्ट २०२१ रोजी दाखवली जाणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

एसटीचा ‘खडखडाट’ सुरूच

रेल्वे प्रवास कागदावर सोपा, प्रत्यक्षात कठीण

‘महाविकास आघाडी सरकार गरीबविरोधी; त्यांना वसुलीतच स्वारस्य’

‘स्टार एअर’कडून ऑलिम्पिक स्टार्सना ‘ही’ ऑफर

याबाबत काही मंत्र्यांनी ट्वीट देखील केले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देखील याबाबत ट्वीट केले. पियुष गोयल ट्वीटमध्ये म्हणतात की,

ते राष्ट्रगीतच आहे जे १३० कोटी भारतीयांना जोडून ठेवते. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे तेव्हा आपणही आम्हाला जोडले जा, आणि आपल्या आवाजात राष्ट्रगीत गा. चला आझादी का अमृतमहोत्सवाचा एक भाग बनूया. अशा ट्वीटमधून त्यांनी लोकांना राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले आहे.

पियुष गोयल यांच्या सोबतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी देखील ट्वीट केले आहे. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या या पुढाकाराला एकमेव असल्याचे म्हटले आहे. यामुळे आपण एक देश म्हणून एकत्र येऊ असा विश्वास देखील मंत्रीमहोदयांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version