व्वा! मोदी सरकारने घोषित केले ६ लाख कोटींचे नवे पॅकेज

व्वा! मोदी सरकारने घोषित केले ६ लाख कोटींचे नवे पॅकेज

कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले टाकली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या या नियोजनाची माहिती दिली. त्यानुसार ६ लाख २८ हजार ९९३ कोटींची मदत अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. शिवाय, आठ नव्या योजनाही यावेळी जाहीर करण्यात आल्या. आरोग्य, पर्यटन व विविध क्षेत्रांसाठी म्हणून ही मदत देण्यात येणार आहे.

नवी दिल्लीत झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना सीतारमण म्हणाल्या की, सरकारने कोरोनाने बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटी कर्जहमीच्या योजनांना मंजुरी दिली आहे. त्याशिवाय, आरोग्य क्षेत्रासाठी अतिरिक्त ५० हजार कोटीही दिले आहेत. त्यातून आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांत सुधारण करता येणार आहेत.

इतर क्षेत्रांसाठी ६० हजार कोटींची तरतूदही करण्यात आल्याचेही सीतारमण यांनी सांगितले. त्याशिवाय, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी अतिरिक्त २३,२२० कोटी रुपयेही देण्यात येणार आहेत. त्यातून लहान मुलांवर विशेष भर देण्यात येईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आता ३० जून २०२१ ते ३१ मार्च २०२२पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेतून २१.४ लाख लोकांना लाभ मिळाला आहे. १५ हजारपेक्षा कमी वेतन घेणाऱ्यांनाही सहाय्य केले जाणार आहे.

अर्थकारणाला नव्याने च्यवनप्राश दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे धन्यवाद, अशा शब्दांत भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version