उड्डाणपूल झाले खड्ड्यांनी बेजार

उड्डाणपूल झाले खड्ड्यांनी बेजार

इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील रस्त्यांची अवस्था बरी असली तरीही उड्डाणपुलांवरील खड्डे मात्र जीवघेणे आहेत.  उड्डाणपुलांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे या खड्डयात वाहने आपटत असल्याच्या घटना घडत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूकही धीम्या गतीने होत आहे. या खड्ड्यांकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील रस्ते आणि पूल दोन्ही प्रशस्त असल्याने वाहने वेगवान असतात अशा वेळी मध्येच एखादा मोठा खड्डा आला की वाहन चालकांची विशेषतः दुचाकी चालकांना समस्या होते.  खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत असतात शिवाय एखादे अवजड वाहन पुलावरून जात असल्यास वाहतूक कोंडीही होत आहे. शीव- पनवेल महामार्गावरील नेरुळ, कोपरा, तळोजा आणि तुर्भे उड्डाणपुलांवर काही ठिकाणी असे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी उड्डाणपुलांच्या मध्यभागी खड्डे आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत

ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली ते थेट रबाळेपर्यंतच्या उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.  कोपरा, तळोजा आणि तुर्भे उड्डाणपुलांवरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्थानकांसमोरील उड्डाणपुलांची अवस्थाही वाईट आहे.  शिळफाटा ते कोपरखैराणे मार्गावर तीन उड्डाणपूल असून या तिन्ही पुलांच्या सुरुवातीला व पूल संपताना मोठे खड्डे पडले आहेत.

काही ठिकाणी पुलाच्या मध्यात मोठे खड्डे पडल्यामुळे चारचाकी वाहनांना त्रास होत असून या खड्ड्यांचा अधिक धोका हा दुचाकी स्वारांना आहे. रबाळे, महापे येथील उड्डाणपूल एमएमआरडीएने बनवले असून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. घणसोली, कोपरखैरणे, रबाळे, टी जंक्शन येथील उड्डाणपूल महापालिकेने बनवले असून तेथील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.

Exit mobile version