पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरं जात आहे.

पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरं जात आहे. पाकिस्तानमध्ये भयंकर महापूर आला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला असून यात आतापर्यंत १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सतत सुरु असून अनेक प्रांतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जागोजागी पाणी साचलं असून पाकिस्तानमधील ‘डॉन’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये या आपत्तीमुळे आतापर्यंत १ हजार जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३४३ मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, देशात १४ जूननंतर सिंध प्रांतामध्ये पुरामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलूचिस्तानमध्येही परिस्थिती गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये असा भीषण पूर याधी कधीही आला नव्हता, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

मुंबई नाही, तर इथे आहे एकनाथ शिंदेंचं मुख्य कार्यालय

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांचे पाणी वस्त्यांमध्ये शिरलं आहे. पीओके, सिंध, बलुचिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान- पाकिस्तान सीमा भाग, स्वात खोऱ्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी लष्करासह सार्वजनिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

Exit mobile version