आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पूर आणि भूस्खलनात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये सुमारे १९ लाख लोकांचे जीवन पुरामुळे विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये झालेल्या एकूण मृतांपैकी १२ आसाममध्ये तर १९ जणांचा मेघालयात मृत्यू झाला आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथेही जोरदार पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अवघ्या सहा तासांत १४५ मिमी पाऊस झाला.
गेल्या ६० वर्षातील हा सर्वाधिक तिसरा पाऊस असल्याचे सांगितले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. आसाममधील सुमारे तीन हजार गावात पुराची परिस्थिती झाली आहे. तर ४३ हजार हेक्टर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. आसामच्या होजाई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी बोट बुडाली, त्यात तीन मुले बेपत्ता झाली तर २१ जणांना वाचवण्यात यश आले.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये पोलिस निरीक्षकाची गोळ्या घालून हत्या
१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट
…. म्हणून अंबानी खरेदी करणार अमेरिकन कंपनी
गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?
आसाम सरकारने पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या लोकांसाठी गुवाहाटी आणि सिलचर दरम्यान विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. यासोबतच मुख्यमंत्री सरमा यांनी अभिनेता अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांचे राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले आहे