उत्तर आफ्रिकेतील देश असलेल्या लीबियामध्ये भयंकर महापूर आला असून यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. डेरना या शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे ७०० लोक गाडले गेले असून १० हजार लोक बेपत्ता झाले आहेत. तर, ५ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
लीबियामध्ये भीषण पूर असून तेथील जनजीवन जबरदस्त विस्कळीत झाले आहे. दरम्यान, प्रशासनाला मृतदेह शोधण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. लीबियातील माजी सरकारमधील आरोग्य मंत्री उस्मान अब्दुल जलील यांनी देशातील परिस्थिती भयावह असल्याचे वास्तव सांगितले. डेरना येथे घटनास्थळी पोहचलेल्या जलील यांनी शहारातील रुग्णलये मृतदेहांनी भरून गेल्याचे सांगितले. डेरना येथे अजूनही शेकडो मृतदेह गाढले गेलेले आहेत किंवा समुद्रात वाहून गेलेत असेही त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, लीबियातील फक्त डेरना या शहरात आतापर्यंत सुमारे २ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर या पुरामध्ये १० हजार लोक बेपत्ता असल्याचे पंतप्रधान ओसामा हमद यांनी सांगितले. दोन धरणं फुटल्याने अनेक लोक वाहून गेले असून ते अद्याप बेपत्ता आहेत. शिवाय हे वाहून गेलेले लोक जीवंत सापडण्याची शक्यता खूप कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू
गोरक्षक मोनू मानेसर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात
संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य
डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश
तेथील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशातील आणखी काही प्रदेशांमध्ये पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो कुटुंब विस्थापित झाली आहेत. त्यांना इतरशहरातील शाळा आणि सरकारी इमारतींमध्ये आसरा घेतला आहे.