पाच हजार घरे जमीनदोस्त; पॅलिस्टिनींची उपासमार

पाच हजार घरे जमीनदोस्त; पॅलिस्टिनींची उपासमार

इस्रायल-हमास दहशतवाद्यांच्या संघर्षात गाझा पट्टीमधील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे इस्रायल सातत्याने बॉम्बवर्षाव करत असताना दुसरीकडे नाकाबंदीमुळे पॅलेस्टिनी नागरिकांना वीज, पाणी आणि अन्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील नागरिक येथून पलायन करण्याचा विचार करत आहेत.

पाणी, स्वच्छता सुविधांचे नुकसान झाल्यामुळे गाझामध्ये चार लाखांहून अधिक नागरिकांचे हाल होत आहेत. गाजा ऊर्जा प्रकल्प हा येथील विजेचा एकमेव स्रोत असून त्यातील इंधनही लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे लाखो जण विस्थापित झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाने (ओसीएचए) मंगळवारी सांगितले.

इस्रायलचे हवाई हल्ले आणि गोळीबारीत घरे आणि इमारतींना लक्ष्य केले गेले आहे. त्यात गाझा पट्टीतील चार मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सात आरोग्य केंद्रे आणि नऊ रुग्णवाहिकांचेही नुकसान झाले आहे. गाझा पट्टीतील यूएनआरडब्लूएमधील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. यूएनआरडब्लूएचे गाझामध्ये १३ हजार कर्मचारी आहेत. त्यातील बहुतेक राष्ट्रीय कर्मचारी आहेत, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट

ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया

शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल

डब्ल्यूएफपीला पुढील महिन्यात आठ लाख पाच हजार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी १.६८ कोटी अमेरिकी डॉलरची आवश्यकता आहे. लोकांची संख्या आणखी वाढल्यास निकटच्या भविष्यात सध्या असलेला निधीही संपुष्टात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात वाचलेले अनेक जण संयुक्त राष्ट्रांनी उभारलेल्या छावण्यांमध्ये आश्रयाला आले आहेत.

Exit mobile version