कॅनडामध्ये एका अपघातात पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कॅनडामधील टोरांटो येथे झालेल्या भीषण कार अपघातामध्ये पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. एक व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलरची धडक होऊन या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये अन्य दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत सिंग (२४), करणपाल सिंग (२२), मोहित चौहान (२३), जसपींदर सिंग (२१) आणि पवन कुमार (२३) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी माँटेरिअल आणि ग्रेटर टोरांटो परिसरामधील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत होते.
भारताचे कॅनडामधील राजदूत अजय बिसारीया यांनी ट्विटरवरुन या अपघाताची माहिती दिली. “कॅनडामधील हृदयद्रावक घटना: शनिवारी टोरंटोजवळ झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सद्भावना व्यक्त करतो. भारतीय अधिकारी मरण पावलेल्या व्यक्तींच्या मित्रांच्या संपर्कात असून त्यांना मदत करत आहेत,” असे ट्विट अजय बिसारीयांनी केले आहे.
हे ही वाचा:
मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’
त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी
देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ट्विट करून या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच भारतीय दुतावासाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य या मृतांच्या जवळच्या व्यक्तींना केले जाईल असे म्हटले आहे.
Deeply mourn the passing away of 5 Indian students in Canada. Condolences to their families. Pray for the recovery of those injured. @IndiainToronto will provide all necessary support and assistance. https://t.co/MAkMz0uwJ7
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 14, 2022