सियाचीन ग्लेशियर ही पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान १९८४ पासून अधूनमधून युद्ध करत आहेत. लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या कॅप्टन शिवा चौहान ह्या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवरील चुमार पोस्टवर तैनात आहेत. लष्करात ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. चुमार पोस्टवर नियुक्तीपूर्वी त्यांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले होते.
३ जानेवारी रोजी, भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती देण्यात आली की फायर अँड फ्युरी सेपर्सचे कॅप्टन शिवा चौहान यांना ऑपरेशनल कुमार पोस्टवर नियुक्त करण्यात आले आहे. सर्वोच्च रणांगणात सक्रियपणे तैनात असलेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी असल्याचेही सांगण्यात आले. कॉर्प्सने ट्विटर पोस्टमध्ये शिवा यांच्या पराक्रमाचा उत्सव साजरा करणारा एक फोटो शेअर केला – ‘ब्रेकिंग द ग्लास सिलिंग’ असे कॅप्शन त्यांनी त्या फोटोला दिले आहे.
आठ भिन्न अपंग लोकांच्या टीमने जागतिक विक्रम केला
सियाचीन ग्लेशियर हे पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. १९८४ पासून भारत आणि पाकिस्तान अधूनमधून लढत आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये, सियाचीन ग्लेशियरवरील १५,६३२फूट उंचीवर असलेल्या चुमार पोस्टवर आठ भिन्न-अपंग लोकांच्या टीमने जागतिक विक्रम केला. त्यांचा पहिला विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी संघाने सियाचीन बेस कॅम्पवरून एक सप्टेंबर रोजी चढाईला सुरुवात केली. चढाई दरम्यान, अंध आणि दिव्यांग संघाला विशेषतः हिमनदीच्या खोल दरी, बर्फाळ हिमनदीच्या प्रवाहांमुळे मोठे आव्हान होते.
हे ही वाचा:
अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!
‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’
सियाचीन हि जगातील सर्वात उंच युद्धभूमी मानली जाते, सियाचीन ग्लेशियर हे पृथ्वीवरील सर्वात कठीण भूभागांपैकी एक आहे. तेथील तापमान उणे ५० अंश सेल्सिअसच्या खाली राहते. सियाचीन ग्लेशियर हिमालयातील पूर्व काराकोरम रेंजमध्ये आहे, जिथे भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा संपते. काराकोरम पर्वतरांगा हिमाच्छादित भागात युरेशियन प्लेटला भारतीय उपखंडापासून वेगळे करते, काहीवेळा ‘तिसरा ध्रुव’ म्हणूनसुद्धा त्याला संबोधले जाते. जगातील ध्रुवीय नसलेल्या प्रदेशातील हि दुसरी सर्वात लांब हिमनदी आहे.