पाकिस्तानमध्ये महत्त्वाची मानली जाणारी सेंट्रल सुपेरिअर सर्व्हिसेस (सीएसएस) या परीक्षेत एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे.
२७ वर्षीय डॉ.सना रामचंद गुलवानी यांनी पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल सुपेरिअर सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. असा विक्रम करणाऱ्या सना या पहिल्या पाकिस्तानी हिंदू आहेत.
पाकिस्तानमध्ये या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी २ टक्क्यांपेक्षा कमी उमेदवार या परीक्षेत यश मिळवू शकले आहेत. यावरूनच अंदाज येतो की, ही परीक्षा किती अवघड आहे. पाकिस्तानमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये सेंट्रल सुपेरिअर सर्व्हिसेस या परीक्षेमार्फत भरती केल्या जातात. ही परीक्षा भारताच्या नागरी सेवा परीक्षेसारखी मानली जाते.
मिडीयाच्या अहवालानुसार, सना ही सिंध प्रांताच्या ग्रामीण सीटवरून या परीक्षेत बसली होती. ही जागा पाकिस्तान प्रशासकीय सेवेच्या अंतर्गत येते. ‘हा माझा पहिला प्रयत्न होता आणि मला जे हवे होते, ते मी साध्य केले आहे,’ असे मत सनाने व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमधून सरकारी महसुलाची कोटी कोटी उड्डाणे
संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये
‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु
मात्र, सना म्हणाली की तिच्या पालकांची तिने प्रशासनात जावे अशी इच्छा नव्हती. आई- वडिलांचे स्वप्न होते की, तिला वैद्यकीय क्षेत्रात काम करताना पहावे. परीक्षेत मिळवलेल्या यशानंतर सनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी माझ्या आई- वडिलांचे आणि माझे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी डॉक्टर होण्याबरोबरच प्रशासनाचा एक भाग होणार आहे. सानाने पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती सर्जनही आहे.
यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर तिने सेंट्रल सुपेरिअर सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. सनाने शिकारपूरच्या सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. या परीक्षेत बसलेले फक्त १.९६ टक्के लोक उत्तीर्ण होऊ शकले आहेत. भारतातील एका अधिकृत अहवालानुसार तेथे ७५ लाख हिंदू राहतात.