अमेरिकेत राहणारा हत्येतील दोषी केनेथ युगेन स्मिथ याला अलबामा येथे नायट्रोजन गॅसच्या माध्यमातून मृत्युदंड सुनावण्यात आला. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नायट्रोजन गॅस मास्कच्या माध्यमातून मृत्यू देणारा अमेरिका हा जगभरातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. ५८ वर्षीय केनेथला याआधीही मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तेव्हा तो बचावला होता.
३५ वर्षांनंतर मिळाली शिक्षा
सुमारे ३५ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या झाली होती. स्मिथने सुपारी घेऊन ही हत्या केली होती. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी स्मिथला ही शिक्षा मिळाली आहे. याआधी सन २०२२मध्ये त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तेव्हा डॉक्टरांना त्याची नसच सापडली नव्हती. अनेकदा इंजेक्शन देण्याच्या प्रयत्नांनंतरही त्याचा जीव बचावला.
हे ही वाचा:
महायुती सरकारने आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला
१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती
इस्रायलबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय अपमानास्पद
बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही
जगभरात स्मिथच्या मृत्यूवर चर्चा
अलाबामा न्यायालयाने त्यानंतर स्मिथ याला नायट्रोजन गॅसने मृत्युदंड देण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्याला २५ जानेवारी रोजी शिक्षा सुनावली. आता या शिक्षेविरोधात केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. केवळ अमेरिकेतील नागरिकांनीच नव्हे तर मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही अशाप्रकारे मृत्यू देण्यास विरोध केला होता.
अशी मिळाली शिक्षा
नायट्रोजन गॅसने मृत्यू देण्यासाठी त्याला सर्वप्रथम डेथ चेंबरमध्ये नेण्यात आले. तेथे त्याला एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक एअरटाइट मास्क लावण्यात आला. त्यानंतर मास्कच्या साह्याने त्याला नायट्रोजन गॅस दिला गेला. हा गॅस सरळ त्याच्या शरीरात गेला. मास्क लावलेला असल्याने त्याला ऑक्सिजन मिळाला नाही आणि नायट्रोजन गॅसमुळे त्याचा मृत्यू झाला. असे किमान १५ मिनिटे करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गॅस आतमध्ये गेल्यानंतर काही सेकंदातच तो बेशुद्ध झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.