झांबियाचे पहिले राष्ट्रपती केनेथ कौंडा यांचे निधन

झांबियाचे पहिले राष्ट्रपती केनेथ कौंडा यांचे निधन

झांबिया देशाचे पहिले राष्ट्रपती केनेथ कौंडा यांचे गुरूवार, १७ जून रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौंडा हे अफ्रिका खंडातील काही महत्वाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने झांबियात शोककळा पसरली आहे.

१४ जूनच्या सोमवारी केनेथ कौंडा यांना झांबियाची राजधानी असलेल्या लुसाका येथील सैन्याच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्या आले होते. त्यांना न्युमोनियाचा त्रास होत होता. पण त्यांन् कोविडची लागण झाली नव्हती. न्युमोनियाचे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी कौंडा यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या फेसबूक पेजवरून जाहीर केली.

हे ही वाचा :

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

पंतप्रधान मोदींनी वाहीली श्रद्धांजली
केनेथ कौंडा यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनेथ कौंडांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जागतीक नेते आदरणीय केनेथ कौंडा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोण होते केनेथ कौंडा?
१९५० च्या दशकात केनेथ कौंडा हे उत्तर ऱ्होडेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे नेते होते. अफ्रिकेतील ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. १९६४ साली झांबिया स्वतंत्र झाल्यानंतर केनेथ कौंडा हे त्या देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. ते युनायटेड नॅशनल इंडिपेंडन्स पार्टीचे ते प्रमुख होते. झांबियातील एक पक्षीय कारभारामुळे अनेक दशके त्यांनी देशाची सुत्रे सांभाळली. पण अखेर १९९१ मध्ये बहुपक्षीय निवडणूक प्रणाली आल्यामुळे ते पायउतार झाले.

Exit mobile version