संपूर्ण जगाला पुन्हा एकदा हादरवणारा ओमिक्रोन व्हेरियंटच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओमिक्रोनमुळे झालेल्या मृत्यूची जगातील पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
United Kingdom reports first death due to Omicron COVID-19 strain
Read @ANI Story | https://t.co/9RhiVc05JO#Omicron #COVID19 #UK pic.twitter.com/cXusIAKjMu
— ANI Digital (@ani_digital) December 13, 2021
ओमिक्रोनचा संसर्ग झालेल्या शेकडो नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी सांगितले. ३० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच ओमिक्रोनकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहनही त्यांनी जगाला केले आहे.
हे ही वाचा:
‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’
अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी
नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी
श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार; दोन पोलीस शहीद
ओमिक्रोनचा प्रवेश भारतातही झाला असून विविध राज्यांमध्ये रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रोन संसर्ग वाढला आणि जगभरात पसरला. भारतात पहिला ओमिक्रोनचा रुग्ण कर्नाटकमध्ये सापडला. हा रुग्ण परदेशातून प्रवास करून आला होता. भारतात खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बंधने घातली आहेत. तसेच प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. आकडेवारीनुसार देशात कोरोनाच्या नव्या ५ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ४१ जणांना ओमिक्रोनची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे ओमिक्रोनचे निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.