भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

रोइंग, नेमबाजीत मिळून तीन रौप्य, दोन ब्राँझ

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी करताना पाच पदके जिंकली. यापैकी रोइंगमध्ये भारताने ३ पदके जिंकली तर नेमबाजीत भारताच्या खात्यात दोन पदके जमा झाली.

 

 

चीनमधील हँगझोऊ येथे ही आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असून त्यात भारताचे ६५५ खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे. शनिवारी या पथकाने दिमाखदार संचलन केले. त्यात लव्हलिना बोर्गोहेन आणि हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी भारतीय तिरंगा हाती घेत नेतृत्व केले.

 

 

भारताने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. मात्र अद्याप सुवर्णपदकाची नोंद भारताच्या खात्यात झालेली नाही. तीन रौप्यपदके मात्र भारताच्या खात्यात जमा झाली आहेत. त्यात आशी चोकशी, मेहुले घोष, रमिता यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य जिंकले. तर रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदक जिंकले. रोइंगमध्ये भारताने तीन पदकांची कमाई केली आहे. त्यात अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कलमध्ये रौप्य, बाबु लाल यादव आणि लेख राम यांनी पुरुषांच्या पेअरमध्ये ब्राँझ तर भारताने पुरुषांच्या आठ सदस्यांच्या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.

हे ही वाचा:

भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल ‘मोटोजीपी’कडून माफी

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत आता पदकतालिकेत यजमान चीन आघाडीवर असून त्यांच्या खात्यात ९ पदके आहेत आणि ही सगळी पदके सुवर्णपदके आहेत. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात ५ पदके आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हाँगकाँग असून त्यांनी एक सुवर्ण जिंकले आहे.

 

 

२०१८मध्ये भारताचे ५७० खेळाडूंचे पथक उतरले होते. त्यात भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ ब्राँझपदकांसह ७० पदके जिंकली होती. यावेळी पथकाची संख्या आणखी मोठी आहे, त्यामुळे पदकसंख्या वाढणार का, याविषयी कुतुहल आहे.

 

Exit mobile version