25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरदेश दुनिया‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

Google News Follow

Related

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून रेल्वे अपघाताची खोटी बातमी बनवणाऱ्या आणि ती पसरवणाऱ्या व्यक्तीला चीन पोलिसांनी अटक केली. चॅटजीपीटी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याप्रकरणी चीनमधील ही पहिली अटक असल्याचे समजते.

हाँग आडनावाच्या या संशयित आरोपीला कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर करून खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती चीनमधील गन्सू प्रांतातील पोलिसांनी रविवारी एका निवेदनाद्वारे दिली.
२५ एप्रिल रोजी झालेल्या रेल्वे अपघातात नऊजण ठार झाल्याची खोटी बातमी या संशयित आरोपीने दिली होती. सायबर पोलिसांच्या नजरेस ही बातमी आल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपासाची सूत्रे हलवली.

काँगटाँग पोलिसांनी अधिक शोध घेतला असता, त्यांना बैजियाहाओ या ब्लॉगसदृश्य प्लॅटफॉर्मवर सुमारे २० खात्यांनी ही बातमी प्रसिद्ध केल्याचे आढळून आले. बैजियाहाओ चीनचे सर्च इंजिन बैदू कंपनीकडून चालवले जाणारे समाजमाध्यम आहे. या बातम्या १५ हजारांहून जास्त वेळ क्लिक केल्या गेल्या होत्या, त्यामुळे पोलिसांची नजर या बातमीकडे वळली.

हे ही वाचा:

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

मॉलमध्ये खरेदी करताना भारतीय वंशाच्या महिलेला लागली गोळी आणि…

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

अधिक शोध घेतला असता, या मागे हाँग याचा हात असल्याचे आढळून आले आहे. समाजातील शांततेचा भंग करणे आणि संकटाला उत्तेजन देणे अशा गुन्ह्यांप्रकरणी हाँगला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांसाठी कमाल पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु गंभीर प्रकारच्या परिस्थितीत १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारच्या प्रकरणात झालेली ही अटक पहिल्यांदाच लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातच चीन सरकारने अधिकृतरीत्या ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाच्या नियमनासंदर्भात तरतूद केली होती. चॅटजीपीटी हे तंत्रज्ञान थेट चीनच्या आयपी अड्रेसवर उपलब्ध नसले तरी व्हीपीएन कनेक्शनच्या माध्यमातून चिनी वापरकर्ते या सुविधेचा वापर करू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा