इराणमधील शिया धर्मियांच्या एका प्रमुख धार्मिक स्थळावर एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर आठजण जखमी झाले. हा हल्ला फारस प्रांताची राजधानी शिराजस्थित चिराग येथे झाला. या हल्ल्याचा उद्देश काय होता, याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही.
कोणत्याही धार्मिक स्थळावर हल्ला होण्याची ही इराणमधील पहिलीच घटना नाही. याआधीही इराणला इस्लामिक स्टेटच्या सुन्नी धर्मियांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी शियाधर्मियांना निधर्मी मानतात. त्यामुळे इराणमध्ये अशांतता धुमसत असून देशाची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. ‘हा हल्ला एकट्या बंदुकधाऱ्याने केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !
एसी लोकलमध्ये ११ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”
माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?
या हल्ल्यामागे त्याचा हेतू काय होता, हे समजू शकलेले नाही. तसेच, कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही,’ असे फारसचे राज्यपाल मोहम्मद हादी इमानीह यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. शाह चिराग हे धार्मिक स्थळ सर्वोच्च पाच शिया धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे धार्मिक स्थळ इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ६७५ किमी. अंतरावर आहे. याआधी ऑक्टोबर २०२२मध्येदेखील शाह चिरागवर हल्ला झाला होता. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता तर, डझनभर जण जखमी झाले होते.