अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील गुरुद्वारामध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील स्कॉटन भागात हा गोळीबार झाला आहे. स्थानिक पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या गोळीबारात २ जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन शीख गटांमधील वादानंतर हा गोळीबार झाला. गोळीबार करणारा आणि पीडित दोघेही शीख समुदायातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅक्रामेंटो काउंटीमधील गुरुद्वारामध्ये शीख परेडआयोजित करण्यात आली होती.स्कॉटनमध्ये दरवर्षी शीख परेडकाढली जाते. या परेडमध्ये अमेरिका आणि कॅनडातील सुमारे हजारो लोक सहभागी होतात. दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा तेथे जमलेल्या काही लोकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सॅक्रामेंटो काउंटी शेरीफचे प्रवक्ते अमर गांधी, यांच्या म्हणण्यानुसार गोळीबारात सहभागी असलेले तीन लोक एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे या घटनेचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंधित नाही. यापूर्वी देखील काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर एका संशयिताने आपली बंदूक बाहेर काढली आणि भांडणात सहभागी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मित्रावर गोळी झाडली. यानंतर गोळी न लागलेल्या व्यक्तीने बंदूक काढून पहिल्या शूटरवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. फरार आरोपीचे वय २० ते ३० वर्षे आहे.
हे ही वाचा:
परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई
केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!
ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित
अमेरिकेच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास हा गोळीबार झाला. एकाच समाजातील लोकांच्या आपपसातल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.