अमेरिकेतील शाळेत गोळीबार; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

हल्ल्यात पाच जण जखमी

अमेरिकेतील शाळेत गोळीबार; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पुन्हा एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देश हादरला आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेच्या आयोवा राज्यात ही धक्कादायक घटना घडली. आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर या घडलेल्या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित शूटरने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

संबधित आधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबारात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पेरी स्कूलच्या प्राचार्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. एका पीडिताची प्रकृती गंभीर आहे, तर इतर चार जणांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींविरोधात केलेले वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवणार!

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!

चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!

२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

वृत्तानुसार, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांना दिसले की, काही विद्यार्थी आणि शिक्षक लपून बसले आहेत. तर, काहीजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. शूटरचे नाव डायलन बटलर असून त्याचे वय १७ वर्षे आहे. तो घटनास्थळी हँडगनसह मृतावस्थेत आढळून आला. गोळीबाराच्या वेळी संशयिताने सोशल मीडियावर अनेक पोस्टही केल्या होत्या, असं समोर आले आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Exit mobile version