पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार

भारताकडून चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद हल्ल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. भारत सरकार राजनैतिक हालचालींनी पाकिस्तानला सतत कोंडीत पकडत आहे. अशा परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूचं आहेत. पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नसून पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबार केला आहे. २५ एप्रिल आणि २६ एप्रिलच्या रात्री, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वीही २४ एप्रिल आणि २५ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला होता.

काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने लहान शस्त्रांचा वापर करून योग्य प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नियंत्रण रेषेवरील विविध ठिकाणी गोळीबार झाला, ज्यामुळे भारतीय सैन्याला बचावात्मक कारवाई करावी लागली. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की भारतीय सैन्याने परिस्थितीनुसार योग्य प्रतिसाद दिला.

शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. माहितीनुसार, चकमकीत पळून गेलेला एक दहशतवादी जखमी झाला आहे, तर दोन वरिष्ठ पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाजीपोरा वनक्षेत्रात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. एक दिवस आधी, उधमपूर जिल्ह्यात संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत विशेष दलाचा एक जवान हुतात्मा झाला होता.

हे ही वाचा : 

पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना एनएसईकडून १ कोटी रुपयांची मदत!

तेलंगणात १४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण!

नौदल अधिकारी विनय नरवालच्या अस्थी विसर्जित करताना वडिलांचा बांध फुटला

पहलगाममधील हल्ल्यांनंतर, या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाच ते सहा दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्यामागे संशयित असलेल्या आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा या तीन संशयितांचे फोटो जारी केले आहेत. त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

देश पेटला असेल तर असू दे, लंडन तर गार गार आहे...| Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Pahalgam  Attack

Exit mobile version