कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू यांच्या निकटवर्तीच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ओंटारियो प्रांतातील ब्रॅम्पटनमध्ये दहशतवादी पन्नू याचा निकटवर्तीय इंद्रजीतसिंग गोसल याच्या घराच्या खिडकीवर गोळीची खूण आढळली आहे. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. इंद्रजीतसिंगने नुकतीच टोरंटोतील भारतीय दूतावासाबाहेर १७ फेब्रुवारी रोजी खलिस्तानच्या समर्थनार्थ रॅली काढण्याचे जाहीर केले होते. त्याने पन्नूच्या सोबत काम केल्याचे सांगितले जाते.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या निकटवर्तीयाच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही गोळीबाराची घटना समोर आली आहे. निज्जरचा सहकारी सिमरनजीत सिंग याच्या सरे येथील घरावर नुकताच गोळीबार झाला होता. प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा नेता निज्जर याची गेल्या वर्षी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
हे ही वाचा:
‘चर्चेला तयार, परंतु नवीन मुद्दे आणणे थांबवा’
दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर ‘आप’चे पक्ष कार्यालय!
गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीतून इंदिरा गांधी, नर्गिस दत्त यांची नावे वगळली
कॅनडा सरकारने निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. दुसऱ्या देशाच्या लोकतांत्रिक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे भारताचे धोरण कधीही नव्हते, असेही भारताने स्पष्ट केले होते. तसेच, कॅनडाच भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा दावा भारतातर्फे करण्यात आला होता.