अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अमेरिकेतून वारंवार गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. टेम्पे पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कार्यालयात कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी झालेली नाही पण कार्यालयाचे थोडे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे त्या इमारतीत काम करणाऱ्यांच्या तसेच जवळपासच्या लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे असून घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि परिसरातील इतरांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
ज्या भ्रष्ट व्यक्तीला तुरुंगात टाकले त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी होते हे अमान्य
जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!
जम्मू- काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान; २३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव
गेल्या दोन आठवड्यांत कार्यालयांवर झालेले हल्ले पाहता ही दुसरी घटना आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. राज्यांच्या गुप्तचर युनिटने चेतावणी दिल्यानुसार अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेपच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले होत असल्याचे बोलले जात आहे.