खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याचा निकटचा सहकारी मानल्या जाणाऱ्या एका दहशतवाद्याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी कॅनडातील पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
कॅनडातील सरे पोलिसांनी या प्रकरणी १६ वर्षीय मुलांना अटक केली. या दोन्ही मुलांनी निष्काळजीपणे बंदुक वापरल्याबद्दल त्यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या घरात शोध घेतला असता त्यांच्या घरी सापडलेली बंदुकही पोलिसांनी जप्त केली आहे. हरदीपसिंगचा निकटवर्ती सिमरनजीत सिंग याच्या घरावर हा गोळीवार झाल्याचे सांगितले जाते.
गेल्या वर्षी सरे येथे झालेल्या गोळीबारात निज्जर मारला गेला होता. त्याच्या हत्येमागे भारतीय सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केला होता. मात्र भारतीय सरकारने हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत ते फेटाळून लावले होते.
हे ही वाचा..
लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार
उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामजाडेजा, केएल राहुल भारतीय संघात परतले
सलमान खुर्शीद यांच्या पत्नीसमोरील अडचणींत वाढ
सिमरनजीत सिंगने नुकतेच व्हॅनकोवर येथील भारतीय दूतावासासमोर खलिस्तानच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते, त्यानंतर ही गोळीबाराची घटना समोर आली आहे. असे असले तरी या गोळीबारामागील हेतूचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिस विभागाचे प्रवक्ते सरबजित सांघा यांनी सांगितले. सीबीसी न्यूजशी बोलताना संघा म्हणाले की, दोन अल्पवयीन मुलांच्या घराची झडती घेण्याचे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून तीन बंदुका आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. तर, या दोन संशयितांना कोणतेही आरोप न ठेवता सोडून देण्यात आले आहे.