अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या जंगलात आगीने हाहाःकार माजवला असून या आगीचा लोंढा आता लॉस एंजेलिसच्या नागरी वस्तीकडे सरकला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग आता निवासी भागात पोहोचली आहे. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे जवळपास १ लाख लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस या मोठ्या शहराच्या जंगलात लागलेली आग आता आजूबाजूच्या रहिवासी भागात पोहोचली आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने आता भीषण रूप धारण केले आहे. ही आग लॉस एंजेलिस आणि आता हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. यानंतर राज्यात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. तसेच यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांचा इटली दौरा रद्द केला आहे.
पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टमध्ये पसरलेल्या आगीशी लढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी केली जात आहे. पॅलिसेड्समध्ये १५ हजार एकर, ईटनमध्ये १० हजार एकर आणि हर्स्टमध्ये ५०० एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मंगळवारी जंगलाला आग लागण्याची ही घटना पहिल्यांदाच समोर आली होती. तेव्हापासून आग पसरत चालली आहे. गेल्या काही दिवसांत या आगीने हजारो एकरहून अधिक जमीन जळून खाक झाल्याचे बोलले जात आहे. ही आग आता ज्या भागात पसरत आहे तो भाग लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील सांता मोनिका आणि मालिबू या बीच शहरांमध्ये येतो. विशेष बाब म्हणजे याच भागात अनेक सिने क्षेत्रातील नामवंत आणि संगीत उद्योगाशी संबंधित मोठ्या व्यक्तींची घरे आहेत.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली
उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे; होणार कारवाई
रशियाचा युक्रेनच्या झापोरिझिया शहरावर क्षेपणास्त्र हल्ला; १३ ठार
‘हिंदूंना एका धाग्यात बांधणारा उपक्रम म्हणजे हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावा’
या आगीच्या प्रभावामुळे आता जवळपासच्या शहरांमधून उड्डाण करणाऱ्या किंवा या विमानतळांवर उतरणाऱ्या विमानांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात लागलेल्या या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आजूबाजूची दृश्यमानता खूपच कमी झाली आहे.