हिजाबविरोधी आंदोलकांच्या तुरुंगाला आगीने वेढले

इराणच्या तेहरानमधील ‘इविन’ या तुरुंगात शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची माहिती आहे.

हिजाबविरोधी आंदोलकांच्या तुरुंगाला आगीने वेढले

इराणच्या तेहरानमधील ‘इविन’ या तुरुंगात शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची माहिती आहे. महसा अमिनी या इराणी तरुणीच्या मृत्यूनंतर देशात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तुरुंगात गोळीबार आणि चकमक झाल्याचेही वृत्त आहे. तुरुंगात लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडीओ इराणी पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इविन या तुरुंगात राजकीय कैदी, पत्रकार आणि सरकारविरोधी कार्यकर्ते बंदिस्त आहेत. इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनात अटकेत असलेल्या नागरिकांनाही याच तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यामुळे या तुरुंगात झालेल्या चकमकीचा संबंध हिजाबविरोधी आंदोलनाशी जोडण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तुरुंगाला लागलेली आग नियंत्रणात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा 

‘महिला आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय नाही’

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

काश्मीरच्या सार्वजनिक उद्यानात फडकला १०८ फूट उंच तिरंगा

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटलं आहे. हिजाबला विरोध करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमिनी यांना संस्कृतीरक्षक पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात महसा यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version