पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इम्रान खान यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं असून त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी इम्रान खान हे इस्लामाबाद सत्र न्यायालयात हजर झाले होते. तसेच त्यांनी न्यायाधीशांची माफी मागितली होती. इम्रान खान यांनी पोलीस आणि महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना एका सार्वजनिक रॅली दरम्यान धमकी दिल्याचा आरोप आहे.
इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत?
नेते शाहबाज गिल यांच्या अटकेविरोधात इम्रान खान यांनी २० ऑगस्ट रोजी इस्लामाबादमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीदरम्यान इस्लामाबादच्या पोलिस महानिरीक्षकांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. तसेच इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश जेबा चौधरी यांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणात त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी
… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा
शाओमीला ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड
ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक
त्यानंतर आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते किंवा नजरकैदेत ठेवले जाऊ शकते.