महावितरणच्या दिव्याखाली मिट्ट अंधार!

महावितरणच्या दिव्याखाली मिट्ट अंधार!

आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य पिचले आहेत, त्यात आता वीजेचे बिल न भरलेल्या थकबाकीदारांची वीज कापल्यामुळे त्यांच्या समस्येत नवी भर पडणार आहे. आतापर्यंत एक लाख थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. वीज बिलाच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून ही थकबाकी अशीच राहिली तर महावितरणला वीज खरेदीसाठी आणि इतर खर्चांसाठी पैसे मोजणे कठीण होणार आहे. त्यामुळे ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याचा मार्ग महावितरणने स्वीकारला आहे.

भांडूप परिमंडळातील ठाणे वाशी आणि पेण मंडळातील आतापर्यंत एक लाख ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. भांडूप परिमंडळातील उच्चदाब आणि लघुदाब अशा दोन्ही ग्राहकांची मिळून ४८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ४० कोटी ६१ लाख आहे. लघुदाब ग्राहकांमध्ये घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांची थकबाकी ही २३५ कोटी ७ लाख रुपये इतकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी १८५ कोटी ८ लाख रुपये आहे. तर १८५ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी ही पथदिव्यांची आहे.

हे ही वाचा:

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

महावितरणला वीज पारेषण, वीज खरेदी, बँक कर्जाचे व्याज आणि कर्मचाऱ्यांचे पगार अशा सर्व बाबींवर पैसे मोजावे लागतात. कोरोना काळात अनेक ग्राहकांना वीज बिल भरता आलेले नाही. महावितरणला रोजचे खर्च करणेही अवघड होऊ लागले आहे. परिणामी वीज खंडित करण्यासाठीची मोहीम महावितरणकडून राबवली जात आहे.

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्रे चालू ठेवली आहेत. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन ग्राहक डिजिटल माध्यमातूनही वीज बिल भरू शकतात अशी माहिती भांडुप परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

Exit mobile version