तीन मुलींचे धर्मांतर घडवून आणून त्यांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याची कथा सांगणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींची कमाई केली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात कसे ओढले जाते, याची कहाणीही दाखवा, अशी मागणी दिग्दर्शकाकडे केली जात आहे.
‘या चित्रपटाच्या यशामुळे मी आनंदित झालो असलो तरी मला अतिआत्मविश्वास आलेला नाही. मला सांगण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक कहाण्या आहेत. मला माहीत होते की, हा चित्रपट नक्की यशस्वी होईल. मी या प्रकल्पावर सात वर्षे काम केले आहे. मी या चित्रपटाची क्षमता जाणून होतो,’ असे दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले.
चित्रपटात केवळ महिलांच्या कट्टरवादाबद्दल सांगितले गेले आहे, पुरुषांबदद्ल नाही, या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. ‘ही आधीपासून तीन मैत्रिणींची गोष्ट होती. हे काही ठरवून केलेले नव्हते. आता मात्र काही निर्माते माझ्याकडे पुरुषांना दहशतवादाच्या जाळ्यात कशा प्रकारे ओढले जाते, हे ‘द केरळ स्टोरी’च्या पुढच्या भागात दाखवा, अशी मागणी करू लागले आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”
दंगल घडविण्यामागे कुणाची तरी फूस, आम्ही अद्दल घडवू!
परीक्षेत नापास झाल्यामुळे तिने अपहरणाचे नाट्य रचले!
जयंत पाटलांना ईडीकडून दुसरं समन्स
‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने रविवारी सुमारे २४ कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत १३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट १५० कोटींची कमाई करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.