घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार

भारताची सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली आहे. म्यानमारच्या सीमेवर आता फेन्सिंग करण्यात येणार आहे. म्हणजेच म्यानमार सीमेवर बांगलादेशच्या सीमेप्रमाणे तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. यामुळे भारताची सीमा अधिक सुरक्षित होणार आहे.

म्यानमार सीमेवर कुंपण घातल्यामुळे या भागातील ये जा ही परवानगीशिवाय होणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितलं आहे. म्यानमारच्या ६०० सैनिकांनी आणि लोकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केल्याच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. भारत- म्यानमार सीमेवर संपूर्णपणे कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्यानमार आणि भारतामध्ये लोकांच्या होणाऱ्या मुक्त संचारावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमा भागात तणावाचे वातावरण होते. म्यानमारमधून घूसखोरी केली जात असल्याचे वृत्तही अनेकदा आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचलले आहे. म्यानमार सीमेवरील ये जा यापुढे बंद करण्यात येणार असून सीमेवर तारेचे कुंपण घातले जाणार आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत अंमलबजावणी करेल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

नटली, सजली अयोध्या नगरी…

सानिया मिर्झाशी वेगळा झाल्यावर शोएब मलिकचे तिसरे लग्न

कोणी जावो अथवा न जावो, राम मंदिर सोहळ्याला मी जाणार!

अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसाम दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमेबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.

Exit mobile version