पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनतर त्यांचे निकटवर्ती आणि त्यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांना इस्लामाबादमधील सर्वोच्च न्यायालयाबाहेरून अटक करण्यात आली आहे.
अटक टाळण्यासाठी फवाद चौधरी हे सकाळी ११ वाजता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात हजर होते. फवाद चौधरी हे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर (एमपीओ) च्या कलम ३ अन्वये ही अटक करण्यात आली आहे.
Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) Senior Vice President Fawad Chaudhry arrested from outside Pakistan Supreme Court premises as protests continue in the wake of #ImranKhanArrest, reports Pakistan's media
— ANI (@ANI) May 10, 2023
“इस्लामाबाद उच्च न्यायालयाने १२ मेपर्यंत संरक्षणात्मक जामीन मंजूर करूनही फवाद चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली. पाकिस्तानात जंगल कायदा आहे,” अशी प्रतिक्रिया पीटीआय पक्षाकडून देण्यात आली आहे.
अटकेपूर्वी पत्रकारांशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले की, “सध्या वकील अत्यंत कमकुवत झाली आहेत कारण त्यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. यापूर्वी कधीही कोणत्याही याचिकाकर्त्याला अशाप्रकारे अटक झालेली नाही. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन एक दिवस आधी मंजूर केला होता, जो त्यांनी पोलिसांना दाखवला होता.”
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवार, ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार उसळला आहे. विविध शहरांमध्ये इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
हे ही वाचा:
सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ पुन्हा स्फोट
डिझेलच्या गाड्या बंद करायच्या आहेत, पण तूर्तास नाही!
‘घटनातज्ज्ञां’ वर होईल का सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब?
सत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?
रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयामध्येही आंदोलक घुसले असून पेशावर, फैजलाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.