पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला

हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमासमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू असून हे युद्ध शमण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. गाझा पट्टीत विध्वंस सुरू असताना अशातच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून महमूद अब्बास थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून या युद्धाची भीषणता लक्षात येत आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, त्यांच्या ताफ्यातील संरक्षण अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून हा हल्ला परतवून लावला. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अब्बास यांचे प्राण वाचवले आहेत.

भर रस्त्यात हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता. ‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांना इस्रायलवर कारवाई करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. परंतु, अब्बास यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं म्हणत सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने महमूद अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, संरक्षण दलातील जवानांमुळे महबूद अब्बास थोडक्यात बचावले.

हे ही वााचा :

शालेय पोषण आहारात आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

इस्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठं विधान केलं आहे. गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे, असं स्पष्ट मत अँटोनियो गुट्रेस यांनी व्यक्त केलं आहे.

Exit mobile version