बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना सोमवार, १९ सप्टेंबर रोजी विंडसर येथे त्यांचे पती फिलीप यांच्या शेजारी दफन करण्यात आले.

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

The coffin of Queen Elizabeth II is placed on a gun carriage during her funeral service in Westminster Abbey in central London Monday Sept. 19, 2022.The Queen, who died aged 96 on Sept. 8, will be buried at Windsor alongside her late husband, Prince Philip, who died last year. (AP Photo/Emilio Morenatti,Pool)

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सात दशकं ब्रिटनच्या गादीची सूत्र सांभाळली. जगात सर्वाधिक काळ सत्ता गाजविलेल्या सत्ताधीश म्हणून त्यांची नोंद आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना सोमवार, १९ सप्टेंबर रोजी विंडसर येथे त्यांचे पती फिलीप यांच्या शेजारी दफन करण्यात आले.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबरला स्कॉटलँडमध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराणीच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

महाराणी यांच्या अंत्यविधीला त्यांचे पुत्र राजे चार्ल्स तिसरे, राणी कॅमिला, राजघराण्यातील इतर सदस्य तसेच जगभरातील नेते उपस्थित होते. भारताच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी उपस्थित होत्या.

राणी एलिझाबेथ यांचे ८ सप्टेंबरला निधन झाल्यानंतर दहा दिवस एलिझाबेथ यांची ‘ग्रेट जर्नी’ (अंतिम प्रवास) सुरु होती. त्यानंतर काल सकाळी नऊशे वर्ष जुन्या वेस्टमिन्स्टर हॉलची दारे नागरिकांसाठी बंद करण्यात आली. एलिझाबेथ टॉवरमधील ‘बिग बेन’ घड्याळात त्यांच्या ९६ वर्षांच्या जीवनप्रवासाची आठवण म्हणून ९६ टोल वाजविण्यात आले.

हे ही वाचा:

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

त्यानंतर तासभर चाललेल्या प्रार्थनेवेळी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी बायबलमधील काही ओळी वाचल्या. सकाळी ११ च्या ठोक्याला देशभरात दोन मिनिटांची शांतता पाळून नंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. राजघराण्याची चिन्हे असलेल्या कापडात गुंडाळलेली राणी एलिझाबेथ यांची शवपेटी नौदलाच्या १४२ सैनिकांनी उचलून तोफेच्या गाडीवर ठेवली. त्यानंतर अंत्ययात्रा वेलिंग्टन आर्क येथे आल्यानंतर तेथून शवपेटी विशेष गाडीमध्ये ठेवून ती विंडसर येथे आणण्यात आली. येथे राणी एलिझाबेथ यांच्या दफनविधी करण्यात आला.

Exit mobile version