21 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरदेश दुनियाफेसबूकची पुन्हा दादागिरी, या देशात केल्या बातम्या बंद...

फेसबूकची पुन्हा दादागिरी, या देशात केल्या बातम्या बंद…

Google News Follow

Related

सोशल मिडीयामधील सर्वांच्याच परिचयाचे फेसबूक आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. यातूनच आता फेसबुकने ऑस्ट्रेलियात आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला बंदी घेतली आहे. सध्या फेसबुकचा आणि ऑस्ट्रेलियन सरकारचा मीडिया कायद्यावरून संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण एवढे वाढले आहे की, ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने आपले पेज देखील बंद केले आहे.

या प्रकरणावर फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांनी मीडिया कायद्याच्या विरुद्ध हे पाऊल उचलले आहे. बंदीनंतर ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस, हवामानाशी संबधित माहिती देणारे पेज, सरकारी कार्यालये आणि इतर अनेक पेज बंद केली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

हे ही वाचा:

दुटप्पी ट्विटरला भारतीय ‘कू’ची टक्कर

नव्या मीडीया कायद्याविरोधात ही बंदी घातली जात असल्याचे फेसबुकने म्हटले. या कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.फेसबुकच्या या बंदीचा फटका अनेक वृत्तसंकेत स्थळांना बसला आहे.ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असलेल्यांना फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातम्या वाचता येत नसल्याचे समोर आले आहे. हवामान किंवा इतर सेवांशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ट्विटरचा आणि विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील काही मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली होती. वादग्रस्त मीडिया कायद्यावरून गूगलने देखील ऑस्ट्रेलियात आपले सर्च इंजीन बंद करण्याची धमकी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा