झुक्याची चावडी अशी ओळख असलेल्या फेसबूकने आपले नामांतर केले आहे. फेसबुकचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी या संदर्भातील घोषणा केली आहे. फेसबुक कंपनीचे नाव बदलून आता ‘मेटा’ असे करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक कंपनी आपले नाव बदलण्याच्या चर्चा ना जोर आला होता त्यानुसार ही नामांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मेटा ही नवी ओळख फेसबुक कंपनीला देण्यात आली आहे.
त्यामुळे आता फेसबुक कंपनीचे नाव बदलून मेटा असे करण्यात आले आहे पण या कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या ‘फेसबुक’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव मात्र तेच असणार आहे. त्यात बदल केला जाणार नाहीये. त्यासोबतच व्हॉट्सऍप आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मची नावेदेखील तशीच असणार आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या
पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!
समाजमाध्यमांमधील सर्वात मोठी कंपनी अशी ओळख असणाऱ्या फेसबुकचे नवीन नावाने रिब्रॅंडिंग किंवा मेकओव्हर करण्याचा विचार कंपनी करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग २८ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्याविषयी बोलण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळत होती. परंतु फेसबुक मार्फत या अफवा असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता मात्र फेसबुकने कंपनीच्या वार्षिक कनेक्ट्मध्ये कंपनीचे नामांतर ‘मेटा’ असे करत त्या बातम्या अफवा नसल्याची पुष्टी केली आहे.