पाकिस्तानात रणजितसिंहाच्या पुतळ्याची नासधूस

पाकिस्तानात रणजितसिंहाच्या पुतळ्याची नासधूस

अफगाणिस्तानामध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या अराजक माजले आहे. कट्टरतावादी तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता बळकावल्याचे पडसाद जगात सर्वत्र उमटू लागले आहेत. पाकिस्तानातही हे पडसाद उमटले आहेत.

पाकिस्तानातील लाहोर हे शहर पूर्वीच्या अखंड पंजाब प्रांताच्या प्रमुख शहरांपैकी एक राहिले होते. या शहरात महाराजा रणजित सिंहांचा अश्वारूढ पुतळा आहे. तालिबानच्या विजयानंतर लाहोरमधील कट्टरतावादी मुस्लिमांनी त्यांच्या या पुतळ्याची नासधूस केली आहे. महाराजा रणजित सिंहांचा पुतळा अर्धवट फोडून टाकलेला एका व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. आदित्य राज कौल यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर टाकला आहे. पाकिस्तानच्या तेहरिक ए लब्बैक या कट्टरतावादी संघटनेशी निगडीत असलेल्या लोकांनी केले असल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट

धक्का बसेल, पण मातीपासून ते बनवत होते सोने!

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

लाहोर या शहराला स्वतःचा मोठा इतिहास आहे. या भागावर मध्ययुगात शिखांचे वर्चस्व राहिले होते. त्यामुळे या शहरांमध्ये शिख वर्चस्वाच्या खुणा ठिकठिकाणी आढळून येतात. अशाच प्रकारे लाहोरमध्ये देखील महाराजा रणजित सिंहांचा पुतळा होता. अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर पाकिस्तानातील कट्टरतावादी मुस्लिमांना अधिक बळ मिळाले असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात काबुल पडल्यानंतर तालिबानची राजवट प्रस्थापित झाली. त्यामुळे तेथील नागरीक जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेत. मोठ्या प्रमाणात नागरीकांनी स्थलांतर केले आहे. या अराजकात अनेक नागरीकांनी आपला जीवही गमावला आहे.

Exit mobile version