ओसामा बिन लादेनचे स्वागत करणाऱ्यांनी उपदेश करू नयेत

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा

ओसामा बिन लादेनचे स्वागत करणाऱ्यांनी उपदेश करू नयेत

संयुक्त राष्ट्रात काश्मीरवर पाकिस्तानच्या टिप्पणीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याच व्यासपीठावर प्रतिक्रिया दिली आहे. जे ओसामा बिन लादेनचे स्वागत करतात, शेजारच्या देशाच्या संसदेवर हल्ला करतात ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये उपदेश करू शकत नाहीत, असे म्हणत जयशंकर यांनीअप्रत्यक्षपणे चीन आणि पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मध्ये खुल्या चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी खडे बोल सुनावले आहेत.

दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयशंकर यांनी ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि सुधारित बहुपक्षीयतेसाठी नवीन दिशा’ या विषयावरील खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केला.संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्य रुचिरा कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली बहुपक्षीयतेवर चर्चा झाली. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर चीनचा अप्रत्यक्ष संदर्भ देताना म्हणाले , दहशतवादाच्या आव्हानावर जग अधिक एकसंध प्रतिसाद देत एकत्र येत आहे, परंतु कटकारस्थानांना न्याय देण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा गैरवापर केला जात आहे. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरसारख्या दहशतवाद्यांची यादी करण्याचे अनेक वेळा भारत आणि अमेरिकेचे प्रयत्न रोखलय गेल्या असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

साथीचे रोग, हवामान बदल, संघर्षांमुळे संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता प्रभावित झाली आहे. जग हिंसाचार, सशस्त्र संघर्ष आणि मानवतावादी संकटाने ग्रासले आहे. अशा वेळी जगात शांतता आणि स्थैर्य नांदावी यासाठी महात्मा गांधींची तत्त्वे दिशादर्शक राहिली पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version