काबुल परराष्ट्र मंत्रालयाच्या परिसरात आत्मघातकी हल्ला ,सहा जण ठार

रमजान महिना सुरू होत असताना स्फोट

काबुल परराष्ट्र मंत्रालयाच्या परिसरात  आत्मघातकी हल्ला ,सहा जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूल जबरदस्त स्फोटाने हादरला आहे. काबूलमधल्या परराष्ट्र मंत्रालय मार्गावरील दौदझाई ट्रेड सेंटरजवळ झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट झालेल्या भागात अनेक सरकारी इमारती आणि दूतावास आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत.अफगाणिस्तानमध्ये गुरुवारपासून मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असताना हा स्फोट झाला आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत काबूलमधील परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेला हा दुसरा हल्ला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाजवळ सोमवारी दुपारी अचानक हा स्फोट झाला. परराष्ट्र मंत्रालयाजवळील बिझनेस सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण काबुलचे मुख्य व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. हा स्फोट इतका जोरदार होता की स्फोटाचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटानंतर अचानक मोठी आग लागली आणि आगीच्या ज्वाळांसोबत आकाशात धुराचे लोटच्या लोट दिसत होते.

हे ही वाचा:

तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे

आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू

विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

हा स्फोट झाल्यानंतर बिझनेस सेंटर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भागात एकच गोंधळ उडाला. अचानक चेंगराचेंगरी झाली. स्फोटामध्ये परिसरातील अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर अग्रिशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. एका लहान मुलासह १२ जखमींना काबूलमधील आपत्कालीन रुग्णालयात नेण्यात आले आहे. याशिवाय दोन जणांचे मृतदेहही आणण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव कर्मचारी सक्रिय आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version