इक्वेडोरमध्ये स्फोटकांच्या हल्ल्यात ५ पोलीस अधिकारी ठार

कैद्यांच्या हस्तांतरणादरम्यान झाला हल्ला

इक्वेडोरमध्ये स्फोटकांच्या हल्ल्यात ५ पोलीस अधिकारी ठार

दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये कैद्यांचे तांडव पुन्हा पाहायला मिळाले आहे. कैद्यांच्या हस्तांतरणादरम्यान झालेल्या स्फोटकांच्या हल्ल्यात इक्वेडोरचे किमान पाच पोलीस अधिकारी ठार झाले आहेत. यानंतर इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी दोन प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी या स्फोटासाठी ड्रग टोळ्यांना जबाबदार धरले आहे. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री आणि आजच्या दरम्यान ग्वायाकिल आणि एस्मेराल्डासमध्ये जे घडले ते स्पष्टपणे त्यांचे विचार प्रतिबिंबित करते. ते म्हणाले की आम्ही या लोकांवर अशी कारवाई करू, जेणेकरून हा वाढता हिंसाचार थांबेल. राष्ट्रपतींनी ग्वायाकिल आणि एसमेराल्डा प्रांतात आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. ते म्हणाले की सुरक्षा दल दोन्ही प्रांतांमध्ये कारवाई तीव्र करतील आणि स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजल्यापासून कर्फ्यू लागू केला जाईल.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

एस्मेराल्डामध्ये तीन स्फोट झाले

पोलिसांनी ट्विट केले की दिवसभरात शहर आणि आसपासचे त्यांचे तीन इतर अधिकारी देखील मारले गेले. याशिवाय, एस्मेराल्डामध्ये तीन स्फोट झाल्याची नोंद झाली आहे आणि कैद्यांच्या बदलीच्या निषेधार्थ सात तुरुंग अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version