इराकच्या पूर्व बगदादमध्ये झालेल्या स्फोटात किमान १०जण ठार झाले आहेत. सुरक्षा आणि वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. फुटबॉल स्टेडियमजवळील गॅरेज आणि टँकरमध्ये हा स्फोट झाला.
ही स्फोटके गॅरेजमधील कारला बांधलेली होती. या कारमधील स्फोटामुळे जवळच असलेल्या गॅस टँकरचाही स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्फोटानंतर टँकरचे तुकडे जवळच्या निवासी इमारती आणि फुटबॉल मैदानावर पडले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी .सांगितले.या स्फोटात बळी पडलेले बहुतांश फुटबॉल खेळाडू हे स्टेडियममध्ये खेळत होते. सुरक्षा दल स्फोटाच्या कारणाचा तपास करत असल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की लक्ष्य करून केलेला हल्ला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. इराकच्या संसदेने नवीन मंत्रिमंडळाला मंजुरी दिल्यानंतर दोन दिवसांनी हा स्फोट झाला.
हे ही वाचा:
सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी
गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत
…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली
यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन
पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सौदानी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ हे प्रभावशाली शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांच्या गटातील सदस्यांचा समावेश नसलेल २००५ नंतरचे देशातील पहिले मंत्रिमंडळ आहे . ऑक्टोबर २०१९ मध्ये, बगदाद आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये २०२१ मध्ये लवकर निवडणुका झाल्या. २००३ च्या अमेरिकेच्या आक्रमणानंतर देशात स्थापन झालेल्या राजकीय व्यवस्थेत बदल करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी प्रचंड निदर्शने केली होती.