इराणच्या बंदरात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आली आहे. या स्फोटात ५०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. दक्षिण इराणच्या बंदर अब्बासमधील शाहिद राजाई बंदरात शनिवार, २६ एप्रिल रोजी भीषण स्फोट झाला. माहितीनुसार, या स्फोटात किमान ५१६ लोक जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटानंतर घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शाहिद राजाई बंदरात झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे बंदरातील कामकाज थांबवण्यात आले आहे, अशी इराणच्या निम शासकिय वृत्तवाहिनी तस्त्रिमने दिली आहे. तर, मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे अनेक जण जखमी किंवा मृत्युमुखी पडले असू शकतात, अशी भीतीही वर्तवण्यात येत आहे.
माहितीनुसार, कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. तर, या स्फोटाचा परिणाम अनेक किलोमीटर अंतरावर दिसून आला. शाहीद राजाई बंदराच्या घाटावर साठवलेल्या अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे ही घटना घडली. जखमींना बाहेर काढण्याचे आणि वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
हे ही वाचा..
हिंदूंनो, तुमचा गजनी झाला असेल तर ही विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा…
संरक्षण मोहिमा, सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नका!
निरपराध हिंदुच्या सत्यनिष्ठेची कहाणी सांगणाऱ्या ‘दाभोळकरहत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन
लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप घ्या, जंक फूड टाळा
शाहीद राजाई बंदर हे कंटेनर वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे, जिथे तेल साठवणूक आणि पेट्रोकेमिकल ऑपरेशन्ससाठी अतिरिक्त सुविधा आहेत. नॅशनल इराणी पेट्रोलियम रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनी (NIPRDC) ने स्पष्ट केले आहे की शाहिद राजाई बंदरात झालेल्या अलीकडील स्फोट आणि आगीचा त्यांच्या तेल सुविधांवर कोणताही परिणाम झाला नाही. “शाहिद राजाई बंदरात झालेल्या स्फोट आणि आगीचा या कंपनीशी संबंधित रिफायनरीज, इंधन टाक्या, वितरण संकुल आणि तेल पाइपलाइनशी कोणताही संबंध नाही,” NIPRDC ने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.